... तोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच - फडणवीस

... तोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच - फडणवीस

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DCM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, 'जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे (Maharashtra) आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच (Chhatrapati Shivaji Maharaj) असतील.आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराजच असतील, त्यामुळे यावर वाद व्हायचे कारण नाही, असे मला वाटते. राज्यपाल्यांच्या मनातही हे स्पष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आदर्श कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कोणताही दुसरा अर्थ काढला जाऊ नये, असे मला वाटते,' असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींच्या विधानावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सुधांशु त्रिवेदींचे वक्तव्य मी नीट ऐकले आहे आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असे म्हटलेलं नाही, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com