
मुंबई | Mumbai
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) शाईफेक झाली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते...
त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी बंदोबस्तावर असलेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित (Suspended) केले होते. तसेच शाईफेक करणाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री (Home Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत...
फडणवीसांनी शाईफेक करणाऱ्या तरुणावर लावण्यात आलेले ३०७ कलम व ११ पोलिसांवर (Police) केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी असे, आदेश पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेक (Ink Throw) प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणे हे अयोग्य असल्याचे म्हणत शाईफेकीचा निषेध केला होता.