Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीसांची उद्धव ठाकरेंना मैत्रीची साद; म्हणाले, आम्ही शत्रू नाही तर...

फडणवीसांची उद्धव ठाकरेंना मैत्रीची साद; म्हणाले, आम्ही शत्रू नाही तर…

मुंबई | Mumbai

२०१९ च्या निवडणुकीवेळी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजप आणि शिवसेनेत (BJP and ShivSena) दुफळी निर्माण झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी युती तुटायला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जबाबदार धरले होते. तेव्हापासून फडणवीस आणि ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

तर दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (Congress and NCP) एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन केले. हे सरकार अडीच वर्ष चालले, पंरतु एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मोठ्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार बनवले व स्वत: मुख्यमंत्री झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

MPSC उमेदवारांना मोठा दिलासा

त्यानंतर उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एका कार्यक्रमात बोलताना “देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत आमच्यात राजकीय विरोध असू शकतो पण आम्ही अजूनही त्यांना मित्र मानतो, तुम्ही त्यांना विचारा ते आम्हाला काय समजतात? असे विधान केले होते. त्या विधानावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले असून ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Women T20 World Cup : सामन्याआधीच भारताला मोठा धक्का; ‘ही’ खेळाडू सेमी फायनलमधून बाहेर

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजिबात नाही. महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. अलिकडच्या काळात एक शत्रूत्त्वाची भावना पहायला मिळते. पण, ती आपल्याला संपवावी लागेल. उद्धवजी आणि आदित्य यांनी वेगळा राजकीय मार्ग पत्करला, आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही शत्रू नाही, तर वैचारिक विरोधक आहोत, असे फडणवीसांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; पुढील युक्तिवाद ‘या’ तारखेला

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

‘देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही’, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले होते.

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून

- Advertisment -

ताज्या बातम्या