Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याऑडिओ, दोन पात्र अन् अन् वक्फ बोर्ड; फडणवीसांचा आणखी एक पेनड्राइव्ह बॉम्ब

ऑडिओ, दोन पात्र अन् अन् वक्फ बोर्ड; फडणवीसांचा आणखी एक पेनड्राइव्ह बॉम्ब

मुंबई | Mumbai

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एका पेन ड्राईव्ह ब़ॉम्ब (Pen drive Bomb) फोडला आहे. यात एक ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. फडणवीसांनी आज पुन्हा एकदा आज एक पुरावा सादर करत, महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

- Advertisement -

मंत्री नवाब मलिकांवर(Nawab Malik) निशाणा साधत दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर (Waqf board) नियुक्ती केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. वक्फ बोर्डात कसे पैसे कमवायचे याबाबतचा संवाद असलेला पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. वक्फ बोर्डाचे डॉ. मुद्दशीर लांबे आणि अर्शद खानशी संवाद झाला. या संवादात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं.

तसेच या दोघांना वक्फ बोर्डावर नियुक्त करण्यात आलं आहे. या महिलेने दोघांपैकी मुदाससीर लांबे याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली, मात्र तरीही त्याला अटक केली नाही. मात्र महिलेच्या पतीला चोरीच्या आरोपातून अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या