Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची गृहमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल; दिले 'हे' आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची गृहमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल; दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिराजवळून एक मिरवणूक जात असताना मिरवणुकीतील काही जणांनी मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल उघडकीस आली होती. शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. यानंतर पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात होती…

- Advertisement -

त्यानंतर मंदिर प्रशासनाने त्र्यंबकेश्वर पोलिसांना (Trimbakeshwar Police) निवेदन देऊन याबाबत दक्षता घेण्याची मागणी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी देखील तातडीने चौकशी केली. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाने केली होती. तसेच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील ब्राह्मण महासंघाने दिला होता.

एसटी-लक्झरी बसचा अपघात; सहा प्रवासी गंभीर जखमी

यानंतर आता या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथित घटनेची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत केली जाणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात फडणवीसांच्या ऑफीशल सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Video : जानोरीत केमिकल कंपनीस आग

तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या