Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याED Raids : ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीचा छापा; फडणवीस म्हणाले, "ज्या लोकांचे कनेक्शन..."

ED Raids : ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीचा छापा; फडणवीस म्हणाले, “ज्या लोकांचे कनेक्शन…”

मुंबई | Mumbai

आज सकाळी ईडीने (ED) मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी छापे (Raid) टाकले आहेत. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचे बोलले जात असून एका सनदी अधिकाऱ्याच्या ठिकाणांवरही ईडीने छापा टाकला आहे.

- Advertisement -

या छापेमारीत माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता या छापेमारीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nashik News : युवकाची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

यावेळी फडणवीस म्हणाले की, “नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये (Mumbai NMC) कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा (Scam) बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आले. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळाले आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

मोठी कारवाई! ईडीची मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी छापेमारी; आदित्य ठाकरे, संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचा समावेश

तसेच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सुरज चव्हाण यांच्या घरावर देखील ईडीने छापा टाकल्याचे बोलले जात आहे. याचे थेट कनेक्शन जंबो कोविड सेंटर घोटाळ्याशी आहे का? याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, ‘मला असे वाटते की ज्या-ज्या लोकांचे कनेक्शन असेल त्यांच्या घरीच ही छापेमारी चालली असेल. याबद्दल अधिकृत माहिती ईडीचे अधिकारीच देऊ शकतील’,असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

“…तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती”; शिंदेंच्या शिवसेनेतील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

- Advertisment -

ताज्या बातम्या