“जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव...”; अमृता फडणवीस यांच्या देवेंद्रजींना अनोख्या शुभेच्छा

“जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव...”; अमृता फडणवीस यांच्या देवेंद्रजींना अनोख्या शुभेच्छा

मुंबई | Mumbai

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटर आणि इतर सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र या सगळ्या शुभेच्छांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेत आल्या आहेत. (Devendra Fadnavis Birthday)

“जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!” आशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. तसेच ट्विट सोबत अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना जिलेबी भरवत असलेला फोटो ट्विट केला केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com