Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपासोबत शिवसेनेस बाळासाहेबांनी सडवलं का? फडणवीस यांचा पलटवार

भाजपासोबत शिवसेनेस बाळासाहेबांनी सडवलं का? फडणवीस यांचा पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackery Jayanti) यांच्या जयंती निमित्त राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत आहे कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. दरम्यान त्यांच्या या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी टीका केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मालेगावच्या युवकाच्या उद्योगात ‘लेन्सकार्ट’चे सीईओ झाले भागिदार

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले, “सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे. पण जे निवडक विसरण्याची पद्धत आहे त्यासाठी आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

काय आहे धुळीचे वादळ? कसे निर्माण होतात धुळ कण

तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय?

फडणवीस म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे. लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवली. कोण होते तुम्ही. राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात तयार होत आहे राम मंदिर. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय, असा सवाल त्यांनी केला. आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. आताही सोडवत नाही. तुमचं हिंदुत्व कागदावर आहे, अशी टाकाही त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या