रांजणगावमध्ये होणार इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर; फडणवीसांची माहिती

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसराजकीय

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने खास करून गुजरातला गेल्याने विरोधी पक्षांकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिंदे गट आणि भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आज मोठी माहिती दिली आहे.

पुण्यातल्या रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करून दिली आहे. पुण्यात होणाऱ्या या प्रकल्पात जवळपास 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, तर 5 हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेण्यात येत आहेत, यावरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याची घोषणा करण्यात आलीय.

नेमकी घोषणा काय?

केंद्रीय राज्यमंत्री राजीव शेखर यांनी केलेल्या घोषणेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार कोरोना काळानंतर इलेक्ट्रॉनिक्स ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पुण्यातले रांजणगाव, तमिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरुपती येथे हा प्रकल्प होणार आहे. त्यानुसार पुण्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून तब्बल पाच हजार रोजगारांची निर्मिती होईल, असा दावा फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com