देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र

राजकीय वर्तुळात ठरला चर्चेचा विषय
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Devendra Fadnavis and Uddhav Thackeray) यांच्यातील राजकीय संबंध सध्या कटुतेचे दिसत असले तरी, राजकारणातील शत्रुत्व कधीही दीर्घकाळ टिकून राहत नाही याचा प्रत्यय आज महाराष्ट्राने घेतला आहे.

राज्याच्या विधीमंडळाचे (Legislature) सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्याचा हा शेवटचा आठवडा आहे. महाविकास आघाडीकडून शिंदे - फडणवीस (Shinde - Fadnavis Government) सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

विधानभवनात (Vidhan Bhavan) सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे वाभाडे काढत असले तरी, सभागृहाबाहेर मात्र काही वेगळचं चित्र असल्याचे पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र
माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे आदेश

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आज सभागृहाचे कामकाज सुरु होत असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सोबतच विधानभवनात प्रवेश केला. अगदी हसतमुखाने गप्पा मारत रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या दोघांनीही विधानभवनात प्रवेश केल्यामुळे सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे इतर आमदार उपस्थित होते. शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणीस एकत्र आले का अशा चर्चा याप्रसंगी सुरु झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com