करोना काळात सरकार पाडण्याचा हेतू नाही
मुख्य बातम्या

करोना काळात सरकार पाडण्याचा हेतू नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवी दिल्ली | प्रतिनिधी

New Delhi

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली व राज्यातील साखर उद्योगातील अडचणींवर त्यांच्याबरोबर चर्चा केली.

साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने फडणवीस यांनी या भेटीमध्ये काही मागण्याही केल्या. केंद्राकडून साखर उद्योगाला दिलासा देण्याच्या संकेत यावेळी मिळाल्याचे समजते. सुमारे दिड तास ही भेट झाली.

यावेळी फडणवीस यांनी केद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांचीही भेट घेतली. केंद्रीय मंत्रीगटाच्या आगामी बैठकीत आजच्या चर्चेतील मुद्दे ठेवू व त्यानंतर यांवर निर्णय घेऊ, असे अमित शहा यांनी सांगितल्याचे समजते.

शहा यांच्याबरोबर ही कुठलीही राजकीय भेट नाही, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, उद्या दुपारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटणार आहेत.

राजस्थानातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची दिल्लीत मोदी-शहा भेट बोलकी असल्याचे येथे म्हटले जाते.

परंतु, करोना काळात सरकार पाडण्याचा आमचा कोणत्याही हेतू नाही, असे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

राज्यातील साखर उद्योगाला अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी, साखर उद्योगालाही ' बेल आऊट ' पॅकेज द्यावे, कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, वित्तीय संस्थांनी कारखान्यांना मदत करावी,

साखर निर्यातीसाठी अनुदान (सबसिडी ) दिले जावे, तसेच साखरेचा शिलकी साठा (बफर स्टाॅक) तयार करण्यासाठी परवानगी देण्यात यावी व इथेनाॅल बाबत इथेनाॅल कंपनीने दीर्घ मुदतीचे करार करावा , इत्यादी मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत गृहमंत्र्यांनी शहा यांच्याकडे केल्या. इथेनाॅल धोरणात मोठे बदल करण्याचे संकेत शहा यांनी यावेळी दिल्याचे कळते.

Deshdoot
www.deshdoot.com