जिल्ह्यातील विकासकामांना गती

विकासनिधी खर्चाची मुदत मार्चअखेर
जिल्ह्यातील विकासकामांना गती

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

जिल्ह्यातील विकासकामांना ( Development works in the district ) आता गती मिळणार असून त्यासाठी जिल्हा नियोजनात निधी ( Funds )किती शिल्लक आहे आणि कोणत्या आमदारांनी किती खर्च केला आहे याबाबत चाचपणी होत आहे.

साधारणपणे 4 कोटींपर्यंत आमदार ( MLA's )विकासकामांचे नियोजन करून निधी घेत असतात. त्याला वाढीव मर्यादा 6 कोटींपर्यंत असते. ही विकासकामे मार्च अखेर जवळ आल्याने आता त्याला गती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, फेब्रुवारी अखेरपर्यंत निधी खर्च आणि विकासकामांत जिल्ह्यातील 15 आमदारांपैकी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार नितीन पवार, सीमा हिरे या आघाडीवर आहेत तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार मोहम्मद इस्माईल, आमदार राहुल आहेर हे अगदीच तळाला आहेत.

दरम्यान, विकासनिधी खर्चाची मुदत मार्चअखेर असल्याने आपापल्या मतदारसंघातील कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठीची प्रक्रिया ( Procedure for completion of constituency works )सुरू आहे. यात आमदारांच्या काही कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे तर काहींची मान्यता प्रक्रियेत आहे.

दरवर्षी आमदारांना आपल्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीतून त्यांना मतदारसंघासाठी कामे घ्यावी लागतात. यामध्ये वाढीव विकासकामांसाठी आमदार सहा कोटींपर्यंतची कामे घेऊ शकतात. त्या

नुसार पुढील आर्थिक नियोजनातील वाढीव खर्चातून त्याच्या कामांसाठी निधीची पूर्तता केली जात असते. या आमदार निधीतून कोणती कामे घ्यावीत याबाबतचा निर्णय सर्वस्वी आमदारांचा असतो.

आमदारांचा निधीखर्च

छगन भुजबळ : 3 कोटी 59 लाख

दादा भुसे : 2 कोटी 33 लाख

नरहरी झिरवाळ : 2 कोटी 01 लाख

नितीन पवार : 5 कोटी 86 लाख

सुहास कांदे : 3 कोटी 04 लाख

दिलीप बनकर : 2 कोटी 77 लाख

हिरामण खोसकर : 3 कोटी 49 लाख

सरोज आहेर : 3 कोटी 04 लाख

माणिकराव कोकाटे : 2 कोटी 24 लाख

राहुल आहेर : 2 कोटी 11 लाख

दिलीप बोरसे : 3 कोटी 42 लाख

मोहम्मद इस्माईल : 93 लाख 80 हजार

सीमा हिरे : 3 कोटी 82 लाख

देवयानी फरांदे : 2 कोटी 69 लाख

राहुल ढिकले : 4 कोटी 52 लाख

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com