पूढील 50 वर्षाचा विचार करुन विकासाला गती देणार: मनपा आयुक्त पुलकुंडवार

मनपा आयुक्त व क्रेडाई पदाधिकार्‍यांची शहर विकासावर चर्चा
पूढील 50 वर्षाचा विचार करुन विकासाला गती देणार: मनपा आयुक्त पुलकुंडवार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

34 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या बांधकाम व्यवसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई (CREDAI) ची शहर विकासातील भूमिका मोलाची आहे.

क्रेडाईसारख्या सामाजिक संस्तांच्या सोबत शहराच्या विकासाच्या पूढील 50 वर्षाचा विचार करन विकास कामांना (Development works) गती देणार असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी केले.

नाशिक मेट्रो (Nashik Metro) तर्फे आयोजित संवाद या कार्यक्रमात बोलत होते. नाशिक (nashik) शहराबाबतच्या विकासाच्या व्हिजनमध्ये अन्य उपक्रमांसोबत गोदावरी नदी (godavari river) ही प्राथमिकता असल्याचे सांगून, निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण नाशिकवर केलेली असल्याचे सांगून आपल्या उद्दीष्टांची मांडणी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन (Ravi Mahajan, President, CREDAI Nashik Metro) म्हणाले की, शहर विकासामध्ये क्रेडाईने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून नवीन आयुक्तांची शहर विकासाबाबतची भूमिका समजावून घेणेहा या चर्चेचा उद्देश असल्याचे सांगितले.

क्रेडाईच्या सूचना

नाशिकच्या (nashik) बाह्य रिंग रोडची (Ring Road) रचना हैदराबादच्या (Hyderabad) 150 मीटर रिंग रोडच्या धर्तीवर करावी, गोदावरीसोबतच नासर्डी नदीचा (Nasardi River) पण विचार व्हावा., स्मार्ट सिटीसोबत (Smart City) नाशिक (nashik) ही स्कीलिंग सिटीच्या (Skilling City) ओळखीसाठी क्रेडाई सक्रिय भूमिका बजावणार, भविष्याचा विचार करुन कचरा डेपोचे विस्तारीकरण (Expansion of waste depots) होण्याकडे लक्ष द्यावे.

घरपट्टीच्या (house tax) दरात सुसूत्रता आणावी, व्यावसायिक तसेच लीज प्रॉपर्टीवरील घरपट्टी कमी करावी, नाशिकच्या पूररेषेमधील जमिनीसाठी नवीन टीडीआर पॉलिसीकडे (TDR Policy) लक्ष द्यावे. नाशिकला समृध्दी महामार्गाने (Samruddhi Highway) जोडण्यासाठी योग्य नियोजन व्हावे तसेच पर्यटन विकासासाठी (Tourism development) टयूलीप (Tulip), रोज गार्डन बनवावे आदी सूचना मांडल्या.

यात प्रामुख्याने क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , क्रेडाई राष्ट्रीयच्या घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, माजी अध्यक्ष नेमीचंद पोतदार ,सुरेश पाटील , उमेश वानखेडे तसेच मॅनेजिंग कमिटी सदस्यांनी भूमिका मांडल्या.

मनपा आयुक्तांची भूमिका

अहमदाबाद (Ahmedabad) मधील साबरमती रिव्हर फ्रंट (Sabarmati River Front) च्या धरतीवर नमामी गोदाप्रकल्प (Namami Goda Project)) राबवून गोदावरी नदी (godavari river) व काठ स्वच्छ सुंदर व प्रदूषण मुक्त करणे, शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन दर्शन घेणार, सिओइपी किंवा आयआयटी अशा संस्थांकडून थर्ड पार्टी ऑडिट करणार,

पुढील 50 वर्ष शहराला पाण्याची चिंता टाळण्यासाठी वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणणार, जलशुद्धीकरण प्रकल्पास आधूनिकीकरण करणार, पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार, अतिक्रमणावर कठोर कारवाई करणार, नाशिकच्या बाहेर रिंग रोडसाठीच्या विविध पर्यायांची चाचपणी करणार,

प्रस्ताविक निओ मेट्रो, सेमी स्पीड रेल्वे,आयटीपार्क, लॉजिस्टिक पार्क हे प्रकल्प लवकरच पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार, मनपाच्या नगर रचना विभागाचे सुसूत्रीकरण करणार, 24 तासात बांधकाम परवानगी दिेण्याचे नियोजन करणार, नवीन बांधकामाचे असेसमेंट तसेच त्वरित पाण्याची जोडणी प्रक्रियेला गती देणार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com