Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासीएसआर फंडातून करणार विकास: आयुक्त पुलकुंडवार

सीएसआर फंडातून करणार विकास: आयुक्त पुलकुंडवार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिका (Municipal Corporation), आयमा (AIMA) आणि सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायजेशन (Sulabh International Social Service Organization) यांनी परस्परांशी समन्वय साधून

- Advertisement -

स्वच्छ नाशिकसाठी नियोजन आराखडा तयार करावा आणि त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षण 2023 (Clean Survey 2023) अंतर्गंत विविध कामांची पुर्तता करण्यासाठी पूढे येण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी (Municipal Commissioner) उद्योजकांना केले.

शहरातील आरोग्याच्या प्रश्नांसोबतच विविध विकास कामांसाठी (Development works) सिएसआर फंडाच्या (CSR Fund) माध्यमातून नियोजन करण्यासाठी विशेष बैठक नुकतीच पार पडली. बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयमा पदाधिकार्‍यांसह अधिकारी उपस्थित हाते. शासनाच्या वेळोवेळीच्या निर्देशान्वये नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) कार्यक्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.

मुख्यत्वे विद्युतदाहीनी, शौचालये, कचरा पेटी या मुद्यांवर चर्चा झाली.नाशिक महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत सीएसआर कॉरर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी फंड (CSR Corporate Social Responsibility Fund) अंतर्गत विविध कामांची पुर्तता करण्या संदर्भातील आढावा यावेळी घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीत महिला कर्मचार्‍यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये महिलांकरीता सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने उद्योगांनी सीएसआर फंडांंतर्गत महिलांकरीता स्वच्छतागृहे बांधावी असे मनपा आयुक्तांनी सािंंगतले.

जुन्या शौचालयांची दुरुस्ती करुन शहरातील बसथांब्यांच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालये उभारण्याबाबतही सुचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. तसेच विद्युतदाहीनी स्मशानभूमीच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली. औद्योगिक क्षेत्राकडून सीएसआर अंतर्गत ‘मानवता भिंती’ची (ह्युमॅनिटी वॉल) उभारणी केली जाऊ शकते. गरजवंतासाठी त्याचा उपयोग होईल असे आयुक्तांनी आवाहन केले. शहरात वर्दळीच्या ठिकाणी, बाजारपेठेत सीसीटिव्हि असतील अशा ठिकाणी रंगीत कचरापेटी बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.यावेळी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायजेशन यांनी सीएसआर अंतर्गत होऊ शकणार्‍या कामांचे सादरीकरण केले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (सेवा) अशोक आत्राम, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.आवेश पलोड, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, सचिन जाधव, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, जनरल सेक्रेटरी ललित बूब, सेक्रेटरी योगिता आहेर, सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायजेशन संस्थेचे प्रतिनिधी सुधाकर किणी, रामनरेश झा तसेच औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या