श्री क्षेत्र सप्तशृंगीगड तीर्थ क्षेत्राचा विकास आराखडा मंजुरीसाठी सादर

भक्त निवारा, बंधारा कामाचा समावेश
श्री क्षेत्र सप्तशृंगीगड तीर्थ क्षेत्राचा विकास आराखडा मंजुरीसाठी सादर

कळवण । प्रतिनिधी Kalwan

सप्तशृंगी गड ( Saptshrungi Temple , Vani ) येथे पिण्याच्या पाण्यासाठी बंधारा, सांडपाणी प्रकल्प, जलवाहिनी, नक्षत्र बगीचा, डोम बांधणे, 11 केव्हीए एलटी वाहीनी भुमीगत करणे, भक्त निवास बांधणे व निवारा शेड बांधणे यासारख्या महत्त्वाच्या कामांचा बृहत् आराखड्यात ( Devlopment Plan )समावेश करण्यात आला. हा आराखडा सुमारे 20 कोटी रुपयांचा झाला आहे.

श्रीक्षेत्र सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडा संदर्भात आमदार नितीन पवार ( MLA Nitin Pawar ) यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे ( Collector Suraj Mandhare ) यांच्यासह विविध विभाग प्रमुख, सप्तशृंगीनिवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी उपस्थितांनी विकासकामावर चर्चा केली.

पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून रु 2 कोटी 50 लक्ष रकमेचे स्टोरेज टँक प्रस्तावित आहे. यासाठी भवानी तलावामधून पाणी न्यावे लागेल व याकरिता लागणार्‍या विजेच्या बिलाचा भार कायमस्वरुपी ग्रामपंचायतीवर येऊ शकतो. विज बिलाचा भार ग्रामपंचायतीवर न पडता स्टोरेज टॅक घ्यावे किंवा बंधारा बांधावा याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या यंत्रणेने तपासून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी केली.

गडावर सांडपाणी प्रकल्प करतांना सांडपाणी कुठेही अन्यत्र मोकळे न सोडता सांडपाण्याचा पुनर्वापर होईल अशी व्यवस्था करावी यासाठी कामाची अंदाजित रक्कम 1 कोटी 50 रुपये असून कामाची पाहणी करुन तत्काळ अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला करण्यात आली आहे.

गडावर डोम बांधण्यासाठी 1 कोटी 54 लक्ष रुपये कामांची अंदाजे रक्कम आराखड्यात असून अद्ययावत शौचालये असावीत, महिलांसाठी जादा शौचालये असावीत यासाठी 1 कोटी 53 लक्ष रुपये कामाची अंदाजे रक्कम आहे. साईड गटारसहित रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 1 कोटी 52 लाख रुपयांचे अंदाजे रक्कम आराखड्यात असून या कामांची पाहणी करुन त्यानुसार अंदाजपत्रक तयार करुन तात्काळ सादर करावे अशी सूचना जिल्हा परिषद विभागाला केली.

गडावरील 11 केव्ही व एलटी लाईन भूमिगत करतांना परिसरातील जमीनीत खडकाचे प्रमाण जास्त असल्याने एलटी लाईन भूमिगत करतांना अडचण निर्माण होऊ शकते . त्यामुळे एलटी लाईन भूमिगत करण्याऐवजी चांगल्या प्रतीच्या खांबावरुन वाहिनी टाकता येईल किंवा कसे याबाबत कामाची अंदाजीत रक्कम 1 कोटी 92 लाख रुपये असून कामाची तपासणी करुन तात्काळ प्रस्ताव सादर करावा याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना सूचना करण्यात आली.

सप्तश्रुंगी गडावरील नक्षत्र बगिच्या कामाची अंदाजित रक्कम 1 कोटी 94 लाख रुपये असून वन विभागाच्या अनुमतीने अंदाजपत्रक तयार करुन तत्काळ सादर करावे अशी सूचना वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना केली. वणी ते सप्तशृंंंगगडापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसाविणे यासाठी कामाची अंदाजित रक्कम 25 लाख रुपये आराखड्यात कामांची पाहणी करुन अंदाजपत्रक तयार करुन तात्काळ सादर करण्याची सूचना विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना आ.नितीन पवार यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com