देशदूत पर्यटन विशेष : अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, वेलनेस टुरिझमसाठी भरपूर वाव

तेजस चव्हाण यांना विश्वास
देशदूत पर्यटन विशेष : अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, वेलनेस टुरिझमसाठी भरपूर वाव

नाशिक | नरेंद्र जोशी Nashik

नाशिकमध्ये धार्मिक, अध्यात्मिक पर्यटनाबरोबरच अ‍ॅडव्हेंचर स्पोटर्स, वेलनेस टुरिझम अ‍ॅन्ड सेेकंंड होमची संकल्पना रुजवण्यासाठी भरपूर वाव आहे. त्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास आगामी काळात नाशिक शहर देशाच्या नकाशावर निश्चित येईल, असा विश्वास विवेदा वेलनेस रिसॉर्टचे संचालक व प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक तेजस चव्हाण (Tejas Chavhan )यांंनी व्यक्त केला. 'देशदूत पर्यटन विशेष' (Deshdoot Tourism Special )मालिकेत चव्हाण यांच्याशी 'देशदूत'च्या संंपादक डॉॅ. वैशाली बालाजीवाले यांंनी संवाद साधला. नाशिकला पर्यटनातून आर्थिक वृध्दी व सर्वांगीण प्रगतीला खूप संंधी असल्याचे त्यांनी सांंगितले.

नाशिकचे वातावरण आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते. ते कसे?

नाशिकला ऋषी मुनी, साधू-महंंतांपासून ब्रिटिशांपर्यत, प्रत्येकाने प्राधान्य दिलेले दिसते. त्याचे मुख्य कारण येथील हवा शुध्द आहे. ब्रिटीशकाळात तर रुग्णांंना अंंजनेरी पर्वतावर आणले जात असे. महिनाभर येथे राहून व सुदृढ होऊन रुग्ण परतत असत. ७० वर्षांंपूर्वीपर्यंंत नाशिकला आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे स्थान होते. तेच स्थान आपण आजही कायम टिकवू शकतो. देवळालीच्या सॅनेटोरियममध्ये आजदेखील मुंबई, गुजरातमधील अऩेक लोक येऊन राहतात. देवळाली सैनिकांंसाठीच वसवले होते. रेल्वे स्थानक त्या द़ृष्टीनेच उभारले गेले होते. अंंजनेरी, त्र्यंबक, जव्हारमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर औषधी जुडीबुटी सापडतात. काढा देऊन अनेकांना बरे केले जाते. साधू-महंंत आजही येथे राहतात. जुन्य जडीबुटीचे ज्ञान फार कमी जणांंना आहे. अंजनेरीतील गवतसुद्धा खूप महत्वाचे आहे. येथील पाना-फुलांंनाही महत्व आहे.

नाशिक शहर परिसरात श्री.काळाराम, कपालेश्वर, त्र्यंबेकश्वर, सप्तशृंंगगड आदी देवस्थाने आहेत. आजही नाशिकला आल्याशिवाय चारधाम पूर्ण होत नाही. मात्र एवढ्याने पर्यटन पुर्ण होेत नाही. त्याला आणखी कशाची जोड दिली पाहिजे?

पूर्वी लोक येेत होते. आजही येतात. पुढेेही येत राहतील यात शंंका नाही, पण त्यांंना संघटितपणे फिरवणारी व्यवस्था नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन करुन फिरवले तर पर्यटन चहूबाजूंनी बहरल्याशिवाय राहणार नाही.

रामायण सर्किट, आंंबेडकर टूर सर्किट तयार होत आहे. आणखी काय सांगता येईल?

टूर सर्किटची संकल्पना अतिशय सुंंदर होती. ती अमलात आली पाहिजे. नाशिकचे जुने वैभव आजही मोबाईल अ‍ॅपद्वारे स्क्रीनवरुन युवा पिढीला सांगण्याची गरज आहे. नाशिक येधे येणार्‍या पर्यटकांना अ‍ॅपच्या माध्यमातुन सर्व माहिती उपलब्ध झाली पाहिजे.

सध्या टुरिस्ट ऑपरेटर जसे सांंगेल तसे त्याचमार्गे जावे लागते. त्यासाठी माहिती कंद्र असले पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळाली पाहिजे. जगभरात कोठेही गेेले तर माहिती केंद्र असतेच. माहिती केंद्रातुन परिपूर्ण माहिती मिळते. नाशिकला चहूबाजूंनी रेल्वे स्थानके, विमानतळ, बसस्थानके येथेे माहिती केंद्रे उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी फार खर्च लागणार नाही. ज्याला पर्यटनाची आवड आहे असे तरुण यात निश्चित हातभार लावू शकतात.

वेलनेस टुरिजम अ‍ॅण्ड सेेकंंड होमचा संकल्पना नाशिकमध्ये रुजत आहे असे वाटते का?

हो, करोनाकाळात मुंबई, दिल्ली, बंंगळुर येथील तीनशे जणांनी नाशिकला दुसरे घर घेतलेे. वेवेदा वेलनेसमध्ये त्या काळात महिनाभर राहणारे कुटुंब दिसले. यातुन नाशिकला त्यांंची पसंती असल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिकला विमानसेवा सुरु झाल्यापासुन त्यांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे दुसरे घर घेण्यासाठीसुध्दा मार्गदर्शन झाले पाहिजे.

अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स वाढत आहे. त्याचा नाशिकला कसा लाभ करु घेता येऊ शकेल?

बर्‍याचदा ब्रम्हगिरी फेरीसाठी, ट्रेकिंगसाठी मुंंबई, पुण्यातुन लोक येतात. मात्र त्यांची गैरसोय होेते. ती दूर झाली पाहिजे. आम्ही 100 घोडे आणून रेस घडवली होती. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सच्या माध्यमातुन येणारा पर्यटत 9 व्यवसायांना वृध्दी देऊन जातो. एवढी शक्ती त्यात आहे.

सध्या नाशिकचे अनेक जण आयर्नमॅन होत आहेत. नाशिकला अ‍ॅयर्नमॅन स्पर्धा होण्यासाठी काय करता येईल?

सध्य नाशिकचे 50 जण आयर्नमॅन झाले आहेत. नाशिकला मुलभूत सुविधा निश्चित आहेत. लोक येथे येऊन सरावही करतात. नशिकला त्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास नाशिकच्या इमेज बिल्डींगसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. नाशिकला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांंसाठी चांगले स्टेेडियम असणे गरजेचे आहे. चांगले खेळाडु घडवाले जाऊ लागले तर नाशिकचा विकास आणखी झपाट्याने होईल. नाशिकला एकाने स्पोर्ट स्कूलची संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. मात्र एका शाळेने प्रश्न सुटणार नाहीत. संघटित प्रयत्नानेच नाशिकचे पर्यटन आणखी वाढु शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com