उद्यापासून नाशिकरोडला ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’

उद्यापासून नाशिकरोडला ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो-2022’ Deshdoot Property Expo-2022 च्या माध्यमातून सामान्यांचे गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी दैनिक देशदूतने Daily Deshdoot उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवार दि. 7 ते 9 जानेवारी 2022 असे तीन दिवस नाशिकरोड येथील महापालिका मैदान, बिटको चौक, जेलरोड येथे या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकरोड शहराने Nashikroad City आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एण्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी, निमसरकारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, टोलेजंग मॉल्स, मुख्य बाजारपेठ, शेतीप्रधान परिसर आणि माळेगाव, शिंदे, सिन्नर औद्योगिक वसाहतींना कनेक्ट असणारा नाशिक-पुणे महामार्ग यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नाशिकरोडच्या अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे.

या प्रॉपर्टी एक्स्पोत नाशिकमधील नामांकित बांधकाम व्ययसायिकांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे. तीन दिवसांत दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यास सोनी गिफ्टकडून गिफ्ट हॅम्पर तर नाशिकमधील सोने-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी मयूर अलंकार यांच्याकडून चांदीचे नाणे दिले जाणार आहे. सामान्यजनांना गृहस्वप्नाची पूर्ती करण्याची अनोखी संधी प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे.

देशदूत प्रॉपर्टी एक्स्पोचे प्रायोजक एचडीएफसी हाऊसिंग HDFC Housing आहेत. दि. 7 ते 9 जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. एक्स्पोदरम्यान करोना नियमांचे काटेकोर पालन होणार आहे. नागरिकांनी 'देशदूत प्रॉपर्टी एक्स्पोला' अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com