पंचवटीत उद्यापासून ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’

गृहस्वप्न साकारण्याची सुवर्णसंधी
पंचवटीत उद्यापासून ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘देशदूत प्रॉपर्टी एक्सपो 2022’च्या (Deshdoot Prpperty Expo- 2022) माध्यमातून सामान्यांना त्यांचे गृहस्वप्न ( Home dream )साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने ' Deshdoot ' उपलब्ध करून दिली आहे.

पंचवटीतील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्स समोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड पंचवटी येथे उद्यापासून (दि.25) हे तीन दिवसीय गृहप्रदर्शन सुरू होत आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत ते सुरू राहणार आहे.

भविष्यातील स्मार्ट सिटी बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. परिसराचा भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते.

सरकारी-निमसरकारी आस्थापना, शाळा-महाविद्यालये, आसपासच्या गावांना जोडणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या बाजारपेठा, शेतीप्रधान परिसर यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पंचवटी भागातील अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे.

प्रॉपर्टी एक्स्पोत नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स ( Stalls of reputed builders in property expo )उपलब्ध करण्यात आले आहेत. अनेक लाभदायक योजनांचा त्यात समावेश आहे. तीन दिवसांत दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यास सोनी पैठणीकडून दररोज 3 पैठण्या तर नाशिकचे सोने-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी टकले ज्वेलर्स यांच्याकडून दररोज 3 चांदीचे नाणे दिले जाणार आहे.

‘देशदूत प्रॉपर्टी एक्सपो’चे प्रायोजक एचडीएफसी हाऊसिंग ( HDFC Housing ) आहेत. दि. 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत दररोज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रदर्शनात सर्वांना प्रवेश खुला आहे. यावेळी करोना नियमांचे काटेकोर पालन होणार आहे. नागरिकांनी या गृहप्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com