Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’

आजपासून ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’

नाशिक । प्रतिनिधी

‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो- 2022’ Deshdoot Property Expo- 2022 च्या माध्यमातून सामान्यांचे गृह स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी देशदूतने उपलब्ध करून दिली आहे. आज पासून नाशिक रोड Nashikroad येथील महापालिका मैदान बिटको चौक जेलरोड येथे सुरू होत असलेला हा एक्स्पो रविवार दि.9 जानेवारी 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.

- Advertisement -

नाशिक रोड शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्ड पर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी-निमसरकारी आस्थापना शाळा महाविद्यालय नाट्यगृह, टोलेजंग मॉल्स, मुख्य बाजारपेठ, शेतीप्रधान परिसर आणि माळेगाव, शिंदे, सिन्नर औद्योगिक वसाहतींना कनेक्ट असणारा नाशिक-पुणे महामार्ग यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नाशिकरोडच्या अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे.

या प्रॉपर्टी एक्स्पोत नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे. तीन दिवसात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यास सोनी गिफ्ट कडून गिफ्ट हॅॅमपर , तर नाशिकमधील सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी मयूर अलंंकार यांच्याकडून चांदीचे नाणे दिले जाणार आहे.

सामान्यजणांना गृह स्वप्नाची पूर्ती करण्याची अनोखी संधी प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे.देशदूत प्रॉपर्टी एक्स्पोचे प्रायोजक एचडीएफसी हाऊसिंग HDFC Housing हे आहेत. दि.सात ते नऊ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. एक्स्पो दरम्यान करोना नियमांचे काटेकोर पालन होणार आहे. नागरिकांनी देशदूत प्रॉपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या