Video : अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंचवटी व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’ चा शानदार समारोप ( ‘Deshdoot Property Expo’ concludes ) करण्यात आला.

शुक्रवारी सुरू झालेल्या प्रदर्शनाच्या तीनही दिवस पंचवटीवासीयांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृह स्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी अनेक नागरिकांनी करोना नियमांचे पालन करून प्रदर्शनाला भेट देत रविवारची सायंकाळ ‘देशदूत'( Deshdoot ) परिवारासोबत घालवली.

मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. बांधकाम व्यावसायिक संस्थांसह गृहोपयोगी संस्थांचे मिळून सुमारे ३० स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

तीन दिवसांत लकी ड्रॉ च्या माध्यमातून सोनी पैठणीकडून पैठणी आणि टकले ज्वेलर्स यांच्या वतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले. जे ग्राहक उपस्थित नव्हते त्यांनी येत्या ७ दिवसाच्या म. गांधी रोड, काँग्रेस भवन येथील दै. देशदूतच्या कार्यालयात संपर्क साधून ओळखपत्र दाखवून आपले बक्षिसे घेऊन जाण्याचे आवाहन देशदूत तर्फे करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत बांधकाम व्यवसायाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळण्यास एक्स्पोची भूमिका महत्त्वाची वाटली. घर व त्यासंबंधीचे पूरक पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने गृहस्वप्नपूर्तीची प्राथमिकता शक्य झाली आहे.

दिनेश वाघ

ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी ‘देशदूत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाहिले पाऊल टाकण्यात खूप मदत मिळाली त्याबद्दल देशदूत चे आभार व्यक्त करते.

संतोष कासट

नेटके आयोजन होते त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती मिळण्यास मदत झाली. एक्स्पो मधील काही प्रकल्प बजेटप्रमाणे तसेच जसे अपेक्षित होते तसे वाटल्याने आम्ही तिथे भेट देणार आहोत. ‘देशदूत’चे मनःपूर्वक आभार.

वैशाली सांगळे

एक ठराविक एरिया डोळ्यासमोर ठेऊन या एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते. येथे सहकुटुंब नागरिकांनी हजेरी लावली खरोखरच त्यांना याचा फायदा झाला. ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त आणि सकारात्मक असल्याने एक्स्पो १००% यशस्वी झाला आहे.

स्टॉल धारक

लकी ड्रॉ विजेते

सोनी पैठणीतर्फे बक्षिसे : ऋषीकेश दराडे; सोमनाथ पडे; शशिकांत कदम.

टकले ज्वेलर्सतर्फे बक्षिसे : कौस्तुभ शिंदे; जय रावल; गोकुळ थोरात.

प्रॉपर्टी एक्सपोचे यश

एक्स्पोच्या शेवटच्या दिवशी (रविवारी) क्रीश ग्रुपच्या ( Crish Group ) २ प्रकल्पांमधील एक २बीएचके फ्लॅट आणि दोन शॉप्सची बुकिंग करण्यात आली. आरटीओ ऑफिस समोरील व्रज लाईफ स्पेस प्रकल्पात अमित बागुल व लता राजगुरू यांनी प्रत्येकी एक शॉप बुक केले. तर व्रज लँडमार्क या मार्केट यार्ड, दिंडोरी रोड येथील प्रकल्पात योगिता बागुल यांनी २ बीएचके फ्लॅट बुक केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *