आजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी
आजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दैनिक 'देशदूत' ( Daily Deshdoot )आयोजित आणि 'क्रिश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स' प्रायोजित ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो 2022’ (Panchavati Property Expo 2022) मधून जनसामान्यांचे गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी मदेशदूतफने उपलब्ध करून दिली आहे.

आजपासून (दि.7) पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरीरोड, नाशिक येथे सुरू होणार्‍या प्रॉपर्टी एक्सपोचे उदघाटन माजी नगरसेवक जगदीश पाटील व अरुण पवार यांच्या हस्ते, क्रिश ग्रुपचे संचालक मनोज लडानी आणि नरेडको नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 4 वाजता होणार आहे. हे प्रदर्शन रविवार दि. 9 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.

भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असताना प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी विभागाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी-निमसरकारी आस्थापना, शाळा महाविद्यालये, आसपासच्या गावांना जोडणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या बाजारपेठा,

शेतीप्रधान परिसर यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंचवटी भागातील अर्थचक्राला त्यामुळे गती प्राप्त होत आहे. या मप्रॉपर्टी एक्स्पोफत ललित रुंगटा ग्रुप, की स्टोन कन्स्ट्रक्शन, श्री अथर्व पार्क, ऋषीराज डेव्हलपर्स, निर्मिती बिल्डटेक, श्रीनाथ रिअल्टी, हरिषलाल हणमंते, आशापुरी कन्स्ट्रक्शन्स, ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रिस्टीन लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, श्रीनिवास डेव्हलपर्स, धात्रक ग्रुप, देशपांडे कन्स्ट्रक्शन्स अँड लँड डेव्हलपर्स, हरी ओम ग्रुप, कपालेश्वर डेव्हलपर्स, ए. आर. डेव्हलपर्स, एपीआरएस प्रॉपर्टी रिटेलर्स, आणि सोमविजय कन्स्ट्रक्शन्स आदी नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे.

तीन दिवस दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यास संस्कृती पैठणीकडून सेमी पैठणी तर नाशिकमधील सोने-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी टकले ज्वेलर्स यांच्याकडून 3 चांदीची नाणी दररोज जिंकण्याची संधी आहे. जनसामान्यांना गृहस्वप्नपूर्ती करण्याची अनोखी संधी मदेशदूतफच्या प्रॉपर्टी एक्सपोफतून उपलब्ध झाली आहे. दि. 9 ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी 'पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो'ला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com