Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : 'देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो'ला शानदार सुरुवात

Video : ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ला शानदार सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ आयोजित तसेच क्रीश ग्रुप प्रायोजित पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

नरेडको नाशिकचे संस्थापक अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी फीत कापून एक्स्पोचे उदघाटन केले. तर प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक अरुण पवार, क्रीश ग्रुपचे संचालक, निकुंज मोरी, हणमंते बिल्डर्सचे संचालक हर्षल हणमंते, देशदूत जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे आयोजन पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड येथे करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि तत्सम असे ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

प्रारंभी अमोल घावरे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. अरुण पवार व जयेश ठक्कर यांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दै. देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर समीर पाराशरे, भगवंत जाधव, आनंद कदम, रितेश जाधव, विशाल जमदाडे, विलास गायकवाड, विनोद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. मुख्य बातमीदार रवींद्र केडीया यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या