Deshdoot News Impact : निमाणीसमोरील वाहतूक सुरळीत

Deshdoot News Impact : निमाणीसमोरील वाहतूक सुरळीत

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

पंचवटीतील निमाणी बसस्टॅण्ड ( Nimani Bus Stand in Panchavati )व परिसरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सातत्याने होणारी वाहतूककोंडी यामुळे प्रवासीवर्गात प्रचंड नाराजी पसरली होती व प्रवासी वर्गाला आणि परिसरातील रहिवाशांना वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

‘देशदूत’मध्ये वाहतूककोंडीचे वृत्त प्रसिद्ध होताच दुसर्‍या दिवसापासून वाहतूक पोलीस प्रशासनाने दखल घेत सकाळपासून उशिरापर्यंत वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी मोलाचे सहकार्य व भूमिका बजावली. त्यामुळे प्रवासीवर्गाने आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वाहतूक कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिला वर्गाला कसरत करावी लागत होती. वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे सहज शक्य झाले.

निमाणी बसस्टॅण्डप्रमाणे इतर ठिकाणी होणारी वाहतूककोंडीदेखील सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालक-मालक व प्रवासीवर्गाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com