Deshdoot News Impact : रस्ता स्वच्छ होऊन दुर्गंधी झाली कमी

jalgaon-digital
1 Min Read

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

पंचवटीमधील तारवालानगर ते राजमाता मंगल कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर दिवाळीनंतर प्रचंड कचरा टाकण्यात आला होता. सर्वत्र कचर्‍याचे साम्राज्य पसरले होते. कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

दैनिक ‘देशदूत’मध्ये तीन दिवसांपूर्वी सर्वत्र ‘कचराच कचरा’ अशी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा तातडीने उचलला असल्याने रस्ता व परिसर मोकळा श्वास घेत आहे. परिसरातील नागरिकांनी व महिला भगिनींनी तसेच शाळकरी मुला-मुलींनी रस्ता स्वच्छ झाल्याने व तेथील दुर्गंधी कमी झाल्याने समाधान व्यक्त केले आहे व दैनिक ‘देशदूत’चे आभार व्यक्त केले.

यानंतर परिसरातील नागरिकांनी कचरा अस्ताव्यस्त टाकू नये, कचरा घंटागाडीतच टाकावा, अशा प्रकारची आशा देखील ज्येष्ठ नागरिकांनी, माता-भगिनींनी व्यक्त केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *