Deshdoot News Impact : ग्रीन जिमची दुरुस्ती

‘देशदूत’च्या वृत्ताची मनपाकडून दखल
Deshdoot News Impact : ग्रीन जिमची दुरुस्ती

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

शहरातील ग्रीन जिमच्या ( Green Gym )दुरवस्थेसंदर्भात दै.‘देशदूत’ने ‘देशदूत फोकस’ ही मालिका चालवली होती. त्यात नवीन नाशिक परिसरातील ग्रीन जिमबाबत ‘तुटलेल्या साहित्यामुळे अपघाताची शक्यता’ असे (9 डिसेंबर ) वृत्त प्रसिध्द केले होते.

त्यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून संभाजी स्टेडियम येथील ग्रीन जिमचे तुटलेले साहित्य बदलून नवे साहित्य बसवले. साहित्याची दुरुस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. व्यायामप्रेमी ग्रीन जिमचा लाभ घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com