Deshdoot News Impact : रस्त्यावरील कचरा उचलला

Deshdoot News Impact :  रस्त्यावरील कचरा उचलला

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

पंचवटीतील तारवाला नगरमधील ( Tarwala Nagar ) छत्रपती संभाजी चौक समोरील राजमाताकडे जाणार्‍या सर्विस रोडवरील कचर्‍याचे साम्राज्य अशी बातमी दैनिक' देशदूत'ने प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागाने बातमीची दखल घेतली व रस्त्याच्या पूर्वेकडील संपूर्ण कचरा उचलून रस्ता निर्मळ केला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने घराची व परिसराची स्वच्छता करताना परिसरातील रहिवासी नागरिकांनी रस्त्याच्या पूर्वेला राजमाता मंगल कार्यालयापासून तारवाला नगरमधील चौकापर्यंत कचराच कचरा टाकल्याने रस्ता कचरामुळे झाला होता. प्रचंड दुर्गंधी पसरली होती. स्वच्छता कर्मचार्‍यांनी वारंवार स्वच्छता करूनही कचरा कमी होत नव्हता.

कचरा उचलल्यानंतर पुन्हा कचरा टाकणारे अजिबात कचरत नव्हते. जोपर्यंत कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत कचर्‍याचे साम्राज्य कमी होणार नाही व दुर्गंधीही कमी होणार नाही. प्रत्येकाने आपल्या परिसराची स्वच्छता राखल्यास आणि कचरा घंटागाडीमध्ये टाकल्यास रस्त्यावर कचरा दिसणार नाही.

कचरा उडणार नाही, व दुर्गंधीदेखील पसरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे परिसरातील काही समजदार ज्येष्ठ नागरिक यांनी बोलून दाखवले. दैनिक 'देशदूत'ने वारंवार बातमी प्रसिद्ध केली असल्याने रस्त्यावरील कचरा आरोग्य विभागाने उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com