Deshdoot News Impact : अखेर शेवगे दारणा पुलाला कठडे

Deshdoot News Impact : अखेर शेवगे दारणा पुलाला कठडे

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

शेवगे दारणा ( Shevge Darna )येथील दारणा नदीवर ( Darna river ) बांधण्यात आलेल्या पुलाचे ( Bridge )कथडे तुटल्यामुळे मागील महिन्यात मोटारसायकलस्वार थेट नदीपात्रात कोसळला होता. याबाबत ‘देशदूत’ने ( Deshdoot )आवाज उठवल्यानंतर लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकार्‍यांनी भेटी देऊन संबंधित पुलाचे कथडे पूर्ववत केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

1995 मध्ये युती शासनाच्या काळात शेवगे दारणा व नानेगाव येथे दारणा नदीवर पूल बांधण्याबाबत निर्णय घेण्यात आल्यानंतर सुरू झालेले काम 2003 मध्ये पूर्ण होऊन 2004 मध्ये पुलाचे लोकार्पण झाले. मात्र पावसाने नदीपात्रात वाढणारे पाणी यामुळे शेवगे दारणा येथील पुलाचे कथडे तुटून गेले. यामुळे पूल धोकादायक बनला होता. याबाबत ‘देशदूत’ने वेळोवेळी आवाज उठवून सदरची समस्या लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती.

त्यातच गत महिन्यात पावसाचे प्रमाण अति झाल्याने पुलावरील भाग निसरडा बनला होता. गत महिन्यात संसरीकडून शेवगे दारणा गावाकडे येणारा मोटारसायकलस्वार गाडीसह थेट नदीपात्रात पडला होता. पुलावरील उपस्थित युवकांनी तातडीने नदीपात्रात उड्या मारत त्या युवकाचे प्राण वाचवले होते. याबाबत ‘देशदूत’ने आवाज उठवत नागरिकांच्या जीवाशी सार्वजनिक बांधकाम विभागाने न खेळता तातडीने पुलाचे कथडे दुरूस्त करण्याची मागणी केली होती.

तसेच या ठिकाणी खा. हेमंत गोडसे, आ. सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप या लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देऊन सदरचे काम करणे गरजेचे असल्याचे मान्य केले. त्यानुसार पुलाच्या दोन्ही बाजूचे कथडे पूर्ववत करण्यात आले आहेत. त्यामुळे या पुलावरून जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांनी तसेच आजूबाजूच्या गावांतील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com