Photo Gallery : अभूतपूर्व प्रतिसादात प्रॉपर्टी एक्सपोची सांगता

Photo Gallery : अभूतपूर्व प्रतिसादात प्रॉपर्टी एक्सपोची सांगता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इंदिरानगर व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 'इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो' चा शानदार समारोप करण्यात आला. यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, काबरा एम्पोरिअमचे संचालक संपत काबरा व सुराणा ज्वेलर्सचे संचालक सम्यक सुराणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली...

शुक्रवारी सुरू झालेल्या प्रदर्शनाच्या तीनही दिवस नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत रविवारची सायंकाळ 'देशदूत' परिवारासोबत घालवली.

मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या 'देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो' प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून 'देशदूत' वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली.

बांधकाम व्यावसायिक संस्थांसह गृहोपयोगी संस्थांचे मिळून सुमारे २२ स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तीन दिवसीय एक्स्पो मध्ये सहभागी झालेल्या स्टॉल धारकांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

तीन दिवसांत लकी ड्रॉ च्या माध्यमातून काबरा एम्पोरिअमतर्फे पैठण्या आणि सुराणा ज्वेलर्स यांच्या वतीने चांदीची नाणी भेट देण्यात आली. जे ग्राहक उपस्थित नव्हते त्यांनी येत्या ७ दिवसाच्या आत म. गांधी रोड येथील दै. देशदूतच्या कार्यालयात संपर्क साधून ओळखपत्र दाखवून आपले बक्षिसे घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'प्रॉपर्टी एक्स्पो'ला भेट देणाऱ्या भाग्यवंत ग्राहक रुपाली देवकर यांना पैठणी देतांना. देशदूतचे वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, देवकर कुटुंबीय आदी.

रवी महाजन, संपत काबरा, सम्यक सुराणा या मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉचे विजेते घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चांदीचे नाणे वितरीत करण्यात आले.

लकी ड्रॉ विजेते काबरा एम्पोरिअम कडून बक्षिसे :

  • निलेश महाजन

  • मधुकर येवले

  • एस. पी सिंग

  • सुराणा ज्वेलर्स कडून बक्षिसे :

  • बाळासाहेब बोरसे

  • सुयोग खानकारी

  • अजित सोनवणे

Related Stories

No stories found.