Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत इम्पॅक्ट: स्मार्ट सिटी कंपनीला जाग; पायर्‍या उभारणीचे काम सुरू

देशदूत इम्पॅक्ट: स्मार्ट सिटी कंपनीला जाग; पायर्‍या उभारणीचे काम सुरू

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गोदावरी घाटावरील (Godavari Ghat) निळकंठश्वराच्या पायर्‍यांच्या उभारणीबाबत (Construction of stairs) सुरू असलेल्या ढिलाई विरोधात ‘देशदूत’ने (deshdoot) वृत्त प्रसिध्द करताच स्मार्ट सिटी कंपनीला (Smart City Company) जाग आली असून,

- Advertisement -

सोमवारी पायर्‍यांसाठीच्या बेसॉल्ट दगडांच्या (basalt rock) गाड्या आणत तातडीने मंगळवारपासून उभारणी कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगितल्याने स्मार्ट सिटीच्या (smart city) या भूमिकेवर गोदाप्रेमी सेवक समितीच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्टसिटीच्या कामाबद्दल सातत्याने शहरभरातून टीका केली जात आहे. त्यांच्या कामाचे नियोजन व गती नेहमीच वादातीत राहिलेली आहे. त्याचा प्रत्यय गोदावरीच्या सुशोभिकरणातून (beautification) आला.

गोदाप्रेमी सेवक समितीच्या माध्यमातून सातत्याने विकास कामंबद्दल (Development works) रेटा लावूनही स्मार्टसिटीच्या (smart city) माध्यमातून फक्त आश्वासनेच दिली जात होती. मागील पाहाणी दौर्‍यात त्यांनी 31जानेवारीपर्यंत पायर्‍यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर काल दै. देशदूतमध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले. त्यात समितीच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यासोबतच संघर्षाची भाषा व्यक्त करण्यात आल्याने स्मार्ट सिटीला जाग आली.

स्मार्टसिटी अधिकारी व ठेकेदाराने तातडीने पूर्व निर्धारित केलेल्या बेसॉल्टच्या दगडी पायर्‍यांचे ट्रक गोदाकाठी रिकामे करुन मंगळवारपासून कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्याने गोदाप्रेमी सेवक समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. सोमवारी अंतिमत: या कामाची पहाणी करण्यात आली, त्यावेळी देवांग जानी, आकिर्र्. योगेश कासार-पाटील व गुप्ता यांनी पाहाणी करुन मार्गदर्शन सूचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या