Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : उपक्रमशील शिक्षक - केशव गावित

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : उपक्रमशील शिक्षक – केशव गावित

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केशव गावित ( Keshav Gavit ) हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी शाळेत शिक्षक आहेत. 365 दिवस नियमितपणे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिकवतात.

- Advertisement -

त्यांच्या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये दाखल होण्याआधीच मुलांना लेखन, वाचन, पाढे, काही शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग पाठ असतात. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना सध्या 50 पर्यंत तर पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांचे 950 पर्यंतचे पाढे पाठ आहेत. सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी एकाच वेळेस वेगवेगळे विषय लिहितात.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वेल्डिंग, इलेक्ट्रिक, शिवणकाम, गवंडीकाम, शेतीकाम यांसारखी कौशल्ये आत्मसात झाली आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी गावाच्या भिंतींवर वारली चित्रे काढली आहेत. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या