देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : क्रीडा शिक्षक दिनेश पागी

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  क्रीडा शिक्षक दिनेश पागी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दिनेश पागी ( Dinesh Pagi )हे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा डोल्हारे (ता. सुरगाणा) येथे 2018 पासून कंत्राटी क्रीडा शिक्षक ( Sport Teacher )म्हणून कार्यरत आहेत. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, मैदानी खेळ याचे प्रशिक्षण ते देतात.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेेळात तरबेज झालेल्या एका खेळाडूने राष्ट्रीय पातळीवर, सात खेळाडूंनी राज्यस्तरावर, पंधरा खेळाडूंनी विभागस्तरीय आणि तीस-चाळीस विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि तालुकास्तरावर यश मिळवले आहे.

पागी दर रविवारी शाळाशाळांत जाऊन विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देतात. ग्रामीण भागतील मुलांसाठी त्यांनी क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. सेवासागर क्रीडा, कला व सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे. निवासी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रही ते चालवतात. जिथे सध्या 50 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com