देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : क्रीडापटू तनिषा कोटेचा

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  क्रीडापटू तनिषा कोटेचा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

टेबल टेनिसमध्ये (Table tennis)19 वर्षांखालील स्पर्धेच्या गुणांकनामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावर 42 व्या क्रमांकावर आहे.

वयाच्या नवव्या वर्षी म्हणजेच 2014 मध्ये ईश्वर टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिमखाना येथे खेळायला सुरुवात केली. राज्यस्तरीय मानांकन स्पर्धेत, 10 वर्षांखालील गटात पहिल्याच प्रयत्नात तनिषा कोटेचाने (Tanisha Kotecha)रौप्यपदक मिळवले.

नांदेड, ठाणे, गोवा, नाशिक, पुणे, चंदिगड, बडोदे, सोनिपत, केरळ येथे झालेल्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 2019 मध्ये हरियाणा येथे झालेल्या 15 वर्षांखालील स्पर्धेत वैयक्तिक गटात तिने रौप्यपदक पटकावले तसेच 14 ते 21 ऑगस्टदरम्यान केरळ येथे झालेल्या स्पर्धेतही रौप्यपदक मिळवले. तिचे आता 2026 मध्ये होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये तसेच ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com