Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : विशेष कर्तृत्व - अमोल जागले

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : विशेष कर्तृत्व – अमोल जागले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अमोल जागले ( Amol Jagle ) वीज मंडळात कंत्राटी कामगार आहेत. इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावातील वीजपुरवठा जुलै 2022 मध्ये खंडित झाला होता. त्यावेळी सतत पाऊस सुरू असल्याने नदी, नाले आणि ओढे यांना पूर आला होता.

- Advertisement -

पुराचे रौद्ररूप पाहून कोणीही त्या दोन गावांमध्ये जायला तयार नव्हते. ग्रामस्थही ते धाडस करत नव्हते. पण जागले थांबले नाहीत. त्यांनी कर्तव्य पार पाडले. वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा चंग बांधला. पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन गावचा विजेचापुरवठा सुरळीत केला.

मागील महिन्यात देवळे भागात विजेची समस्या सोडवायला गेलेल्या जागले यांना अचानक उद्भवलेल्या एका अपघाताला सामोरे जावे लागले. यामध्ये त्यांचा एक पाय कायमचा निकामी झाला आहे. त्याचा बाऊ न करता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आनंदी जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या