Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या‘देशदूत’च्या नि;स्पृह, निर्भिड आणि समाजहितैषी पत्रकारितेची गौरवशाली ५० वर्ष

‘देशदूत’च्या नि;स्पृह, निर्भिड आणि समाजहितैषी पत्रकारितेची गौरवशाली ५० वर्ष

नाशिक | प्रतिनिधी

समाजहितैषी, संतुलित आणि नि: स्पृह, निर्भिड पत्रकारितेचा शिरस्ता जोपासत नव्याची कास धरत माध्यम जगतात ‘देशदूत’चा प्रवास गेली पाच दशके सुरू असून देशदूत उद्या (दि.४) ५१ व्या वर्षात पदार्पण करत आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता करत आहे.

- Advertisement -

अपरिवर्तनीय प्रयत्न, अखंडीत सर्मपण आणि व्यापक विचारधारनेमुळेे ‘देशदूत’ ला हा सुवर्ण वर्षातील टप्पा गाठणे सहज शक्य झाले. ग्रामीण असो अथवा शहरी वाचकांनी केंद्रस्थानी ठेऊन इथवरचा समृद्ध प्रवास पार पाडला.

‘देशदूत’ स्थानिक गाव, तालुका स्तरावरून ते शहरापर्यंत सर्वचीच दखल घेत अनेक वृत्तमालिका प्रसिद्ध केल्या. साहजिकच स्थानिक लोकांमध्ये ‘देशदूत’ने आपल्या पत्रकारितेने आगळा प्रभाव उमटवला. आज ‘देशदूत‘ने सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता करताना ५१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विशेष अंक प्रसिद्ध केला. हे ‘देशदूत’ परिवाराचे मोठे यश आहे.

मानवी स्वारस्थ वृत्तकथा प्रसिद्ध करण्यावर ‘देशदूत’ पत्रकार चमू नेहमीच प्राधान्य देत असतो. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे टाळेबंदीत संपूर्ण विश्‍व एका जागी थांबले असताना ‘देशदूत’ने पत्रकारितेच्या माध्यमातून सकारत्मकता, आश्‍वस्त करणार्‍या वृत्तकथा प्रसिद्ध करून ‘कोविड’मुळे भयभीत आणि अस्वस्थ झालेल्या जनतेला आशाचे किरण दाखवत दिलासा दिला.

किशोरवयीन मुलांना टाळेबंदीत मिळालेल्या वेळाचा सदुपयोग कसा करावा आणि छुपे कौशल्य, कला, अभिनवता याचा शोध घेत विधायक काम कसे करावे, याबद्दल विशेष मार्गदशन केले. कोविड-१९ केंद्रातील रुग्णांशी संवाद साधून त्यांना कसे उपचार मिळत आहेत तसेच त्यांच्यातील उपजत कला-कौशल्य, छंद यामुळे त्यांना या विषाणुवर, आजारावर यशस्वी मात करण्यासाठी कशी उर्जा, प्रेरणा मिळत आहे, यावरही वृत्तमालिकेतून प्रकाश टाकण्यात आला.

करोनाच्या आव्हान काळात ‘देशदूत’ ने विशेष पुरवणी प्रसिद्ध करून समाजहितैषी तत्वांना अधोरेखित करण्यासह माहितीचा स्त्रोत उपलब्ध करुन दिला. टाळेबंदी हळूहळू शिथील होत असताना बाजारपेठेत कमालिचा निरुत्साह, भीती होती. त्याही काळात ‘देशदूत’ने संगणक-मोबाईल अक्सेसरिज, सौर ऊर्जा, गोळे कॉलनी औषधी विशेष, होमिओपॅथी विशेष, भगर मिल, स्वदेशी या आणि अशा विशेष पुरवण्या प्रसिद्ध करुन नकारात्मकतेतून आशाचे किरण दाखवला.

करोना, टाळेबंदीमुळे आलेल्या नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी आणि त्या त्या भागातील माहिती वाचकांना देत त्यांच्या जीवनात मूल्य, सकारात्मक उर्जा देण्यासाठी ‘देशदूत’ने जुलै महिन्यापासून विशेष लेख प्रकाशित करण्याचा उपक्रमास प्रारंभ केला. चहा विक्रेते, टेलरिंग व्यवसाय, स्टेशनरी दुकानदार, ऑटो गॅरेज, फर्निचर विक्रेते या आणि अशा सेवा पुरवठादारांवरील आणखी काही लेख अजून प्रकाशित होणे बाकी आहेत. जे लवकरच वाचकांना वाचता येतील.

‘देशदूत’ परिवार संपूर्ण चमू संघभावनेतून काम करत असून दरवेळी वेगळे आणि अभिनव देण्यासाठी हा चमू सदैव तत्पर असतो. ५० वर्षांचा हा समृद्ध प्रवास अविरत सुरू राहणार असून वाचकांना ‘देशदूत माध्यम समुह’नेहमीच वाचकांना जागृती, ज्ञान आणि माहिती देण्यास वचनबद्ध राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या