Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेशदूतच्या डिजिटल अंकातून साहित्याची मेजवानी

देशदूतच्या डिजिटल अंकातून साहित्याची मेजवानी

नाशिक

दिवाळीला आध्यात्मिक व धार्मिक महत्व जसे आहे, तसे महाराष्ट्रात साहित्यिक महत्व आहे. यामुळे महाराष्ट्रात दिवाळी अंकाची परंपरा आहे. ’देशदूत’ने ही डिजिटल दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे.

- Advertisement -

अनेक नामवंत साहित्यिकांनी दिवाळी अंकातून लेखणास सुरुवात केली आहे. काळारुपाने बदललेल्या तंत्रज्ञानात देशदूतने डिजिटल दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. नवीन व जुन्या साहित्यिकांचा संगम असलेल्या या अंकात आठ विभागातून विविध प्रकारचे साहित्य वाचण्यास मिळणार आहे.

’देशदूत’च्या डिजिटल दिवाळी अंकात गावाकळची दिवाळी, कथा, कविता, आगळं-वेगळं, अनुभव, रेसिपी, वारसा, परिसंवाद आहेत. राज्यातील अनेक लेखकांनी यामध्ये लिखाण केले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी गावाकडच्या दिवाळीचे अनुभव सांगितले आहे तसे नवोदित कवींनी कविताही फुलवल्या आहेत. शहरातील फ्लॅट संस्कृतीत गावाकडची रांगोळी मिस करणे, मॉलमधील खरेदीपेक्षा जुन्या काळात ग्रामीण भागात होणारी खरेदीची आठवणी लेखकांनी रंगवल्या आहेत. एकंदरीत सर्वच प्रकारच्या साहित्याचा खजीना या दिवाळी अंकातून वाचकांना मिळणार आहे.

दिवाळी अंक वाचण्यासाठी https://www.deshdoot.com/diwali2020 येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या