Thursday, April 25, 2024
Homeजळगाव‘देशदूत’ ने जोपासली समाजाप्रती विश्वस्त होण्याची भावना - डॉ.अय्यंगार

‘देशदूत’ ने जोपासली समाजाप्रती विश्वस्त होण्याची भावना – डॉ.अय्यंगार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

समाजासाठी वेळ आणि कौशल्य देणारा ट्रस्टी अर्थात विश्वस्त असतो. ट्रस्टीशीप (Trusteeship) हा शब्द महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी दिला आहे. त्याच मार्गावर जळगावातील पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन, (Padmashri Dr. Bhawarlalji Jain,) डॉ. अविनाश आचार्य (Dr. Avinash Acharya) यांनी मार्गक्रमण केले होते. समाजाप्रती विश्वस्त होण्याची नितांत गरज आहे. विश्वस्त होण्याची भावना देशदूत (Deshdoot) या वृत्तपत्राने संदेशदूत होऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून जोपासली असल्याचे मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. सुदर्शनजी अय्यंगार -Senior Gandhian thinker Dr. Sudarshanji Iyengar= यांनी आज येथे व्यक्त केले.

- Advertisement -

दैनिक देशदूतच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा समारोप कांताई सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुदर्शनजी अय्यंगार हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, केशवस्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, दैनिक देशदूतचे व्यवस्थापकिय संचालक विक्रमभाऊ सारडा उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातील दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोनेे यांनी दैनिक देशदूतच्या 25 वर्षाच्या प्रवासाचा आढावा सादर केला. समाजातील देशदूतचे स्थान विषद करताना विश्वाससार्हता हाच देशदूच्या यशाचा खरा मंत्र असल्याचे ते म्हणाले. नकारात्मतेला प्राधान्य न देता समाजात चांगले काय आहे ते शोधून त्याच्या सामर्थ्याला हक्काचे व्यासपीठ देशदूतने उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.

रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना शोध सामर्थ्याच्या या विषयावर दैनिक देशदूतने वर्षभर काम केले. समाजासाठी ज्या संस्था, व्यक्ती काहितरी चांगले काम करित आहे त्यांचा शोध घेऊन सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून त्यांचा परिचय समाजासमोर घडवून आणला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. सुदर्शन अय्यंगार पुढे म्हणाले की, सध्याची परिस्थीती लक्षात घेता एखादे दैनिक हे राजाश्रय नको असा विचार मांडत आहे. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहे. सध्या प्रिंट मिडीया संपत चालला आहे प्रिंटची जागा स्मार्टफोनने घेतल्याने घडलेली घटना लगेच माहिती होते मात्र अशाही परिस्थीतीत एखादं दैनिक आपलं रौप्य महोत्सव साजरं करित आहे ही आनंददायी बाब आहे.

देण्याची वृत्ती ज्यांच्यामध्ये आहे तेच खरे महाजन आहे. ही संस्कृती भारतीय आहे. ती फार पूर्वी पासून आहे. सीएसआर (कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सब्लिटी) ही संकल्पना आता आली आहे. त्यातही एनजीओ या शब्दात गर्व्हमेंट हा शब्द आलाच आहे. मात्र स्वयंसेवी संस्थांनी त्यांची जबाबदारी आहे की, स्वयंसेवक या भावनेतूनच कार्य केले पाहिजे. प्रामाणिकपणा सेवाभाव आणि बौद्धीकदृष्ट्या समाजातील समस्यांचे निदान करण्याची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांची असल्याचे त्यांनी सांगितले.

जे समाजाचे कल्याण करण्यासाठी प्रयत्न करतात त्या नागरिकांचा हा सन्मान सोहळा असल्याने विशेष समाधान असल्याचे ते म्हणाले. सेवा करणे हाच आमचा धर्म असून यामध्ये कुठल्याही पक्षीय राजनीतीचा आधार नाही त्यामुळेच समाजामधील समस्यांचे अवलोकन करणे त्या समजून घेणे आणि त्याचे निदान करणे यासाठी आपण स्वतंत्र विचारधारेने आपआपले कार्य करत आहात याचाही आनंद त्यांनी व्यक्त केला.

सभागृह भरला खच्चून

दै. देशदूतच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित सेवाव्रतींच्या सन्मान सोहळ्यासाठी जळगाव शहरासह ग्रामीण भागातील वाचक, हितचिंतकांनी कांताई सभागृहात गर्दी केली होती. तसेच सन्मानार्थी स्वयंसेवी संस्थां एकमेकांचे अभिनंदन करतांनाचे चित्र सभागृहात दिसून आले.

एकत्रित येऊन शक्ती वाढवावी – भरतदादा अमळकर

केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रीत येत एकमेकांची शक्ती वाढविण्याची गरज आहे. दैनिक देशदूत हे डायनामिक आणि प्रयोग करणारे वृत्तपत्र आहे ग्रामीण भागातील पत्रकारांची मोठी फळी आणि प्रेस क्षमक करणारे वर्तमान पत्र आहे. केशवस्मृती प्रतिष्ठान 22 प्रकल्पांमध्ये काम करत आहे. चांगलं काम तेच जे माणूस गेल्यावरही सुरूच असते ही शिकवण डॉ. अविनाश आचार्य यांनी दिली आहे. संस्थांचा सन्मान हे कार्यक्रम पुरेशे नाहीत तर अशा स्वयंसेवी संस्थांना एकत्रीत आणून शक्ती वाढविण्याचे काम पुढच्या काळात करावे लागणार असल्याचे भरतदादा अमळकर यांनी सांगितले.

…तर सेवेचा यज्ञ मोठा होईल-जयदीप पाटील

सानेगुरूजींचा आज जन्मदिवस असून त्यांनी अमळनेरला आपली कर्मभूमी बनवली. माणूस कर्माने मोठा होतो, त्याचप्रमाणे देशदूतने जळगावात 25 वर्ष पूर्ण करून तरुण झाला आहे. सामान्य व्यक्तिंना पेपर आपलासा वाटतो. शेतकरी, विद्यार्थी यासह खेड्यात देखील देशदूतने ज्ञानदूत, कृषीदूत म्हणून भूमिका बजावली आहे. भरतदादा यांनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांना जोडून सेवा समुहातून पुढे जाऊ या. तसेच देशदूतचे संपादक हेमंत आलोने यांच्या सहकार्यांने 25 संस्थांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर चार ही व्यक्तींनी राजेपण राखले आहे. लेखणीमध्ये विक्रमभाऊ, उद्योगामध्ये अशोकभाऊ, ज्ञानामध्ये डॉ. सुदर्शन अय्यंगार तर सर्वच क्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे भरतदादा. या व्यक्तिंच्या डिक्शनरीत ‘नाही’ हा शब्द नाहींच. त्यांच्या हस्ते समाजिक संस्थांचा सन्मान झाला. खर तर हे सेवेच्या समुद्रात मोठे मासे, लहान माश्यांना पोसतो. भविष्यात या देशात स्वयंमसेवी संस्थांचे नेटवर्क वाढविल्यास या 25 संस्था एका धाग्यात गुंफले तर सेवेचा यज्ञ मोठा होईल, असा आशावादही सन्मानार्थी जयदीप पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

या संस्थांचा झाला सन्मान…

अमर संस्था, वेले, ता. चोपडा, अभेद्या फाउंडेशन जळगाव, आत्मसन्मान फाउंडेशन, महाराष्ट्र, भरारी फाउंडेशन, जळगाव, जागृती मित्र मंडळ, भडगाव, जळगाव जिल्हा मुस्लीम मणियार बिरादरी, लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा, अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान, जळगाव, मराठी प्रतिष्ठान जळगाव, श्री मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर, नोबेल फाउंडेशन, निधी फाउंडेशन, जळगाव, निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, जळगाव, पर्यावरण जागर मंच, भुसावळ, पशुपापा, जळगाव, रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन जळगाव, रोबिनहूड आर्मी, जळगाव, सुधर्मा ज्ञानसभा, जळगाव, स्वयंदिप प्रतिष्ठान, डांभुर्णी, ता. यावल, सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, एरंडोल, श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव, सेवा धर्म परिवार, जळगाव, वर्धिष्णू फाउंडेशन, जळगाव, मिशन 500 कोटी लिटर जलसाठा, पाच पाटील टीम, चाळीसगाव, आधारवड संस्था, पाचोरा या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव, केशवस्मृती प्रतिष्ठान, रतनलाल सी. बाफना फाउंडेशन ट्रस्ट यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार देशदूतचे जाहीरात व्यवस्थापक प्रदिप जाधव यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या