मुख्याध्यापकासह उपशिक्षिका एसीबीच्या जाळ्यात; लाच घेतांना अटक

मुख्याध्यापकासह उपशिक्षिका एसीबीच्या जाळ्यात; लाच घेतांना अटक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शाळेचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी शिपायाकडून लाच मागणाऱ्या मुख्याध्यापक व उपशिक्षिकेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Bribery Department)सापळा रचत अटक केल्याची घटना मालेगाव ( Malegaon )येथे घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,जागृती माध्यमिक विद्यालय(Jagruti Secondary School), गुरुदत्त नगर, नव वसाहत, सोयगाव, सर्वोदय शिक्षक संस्था ता.मालेगाव. जि. नाशिक या शाळेचा महापालिका हद्दीत समावेश झाला.

याठिकाणी तक्रारदार महिला शिपाई पदावर कार्यरत असतांना त्यांच्या पगारात वाढ होऊन घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल प्रकाश मोरनकर (४४) यांनी शिपाई महिलेकडून १३५० रुपये लाचेची मागणी केली. शिपाई महिलेने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली.

मुख्याधापक मोरणकर यांच्या सांगण्यावरून उपशिक्षिका मनीषा सुदाम चव्हाण (४७) यांनी मुख्याध्यापक दालनात फिर्यादी महिलेकडून १२५० रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक परिक्षेत्र एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक साधना भोये - बेलगावकर,हवालदार सचिन गोसावी,चंद्रशेखर मोरे यांनी केली. याप्रकरणी मुख्याध्यापक मोरनकर व उपशिक्षिका मनीषा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक साधना भोये - बेलगावकर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com