उपायुक्त म्हणतात.. कामचुकारांना नोटीसा देतो.. पण ते ‘वरून’ सेटलमेट करून आणतात...

आयुक्तांच्याच कार्यशैलीवर आक्षेप : महापालिका स्थायी समिती सभा, पाणीपुरवठा प्रश्नावर चर्चा
उपायुक्त म्हणतात.. कामचुकारांना नोटीसा देतो.. पण ते ‘वरून’ सेटलमेट करून आणतात...

धुळे Dhule । प्रतिनिधी

स्थायीच्या सभेत (standing meeting) प्रशासनातील मतभेद (Differences in administration)उघड झाले असून उपायुक्त नांदुरकर (Deputy Commissioner Nandurkar) यांनी कामचुकारांना नोटीसा (Notice to defaulters)बजावल्या असल्याचे सांगितले. मात्र ते वरुन सेटलमेंंट (settlement) करुन आणतात असे नाव न घेता थेट आयुक्तांच्या कार्यशैलीवरच (working style of the Commissioner) त्यांनी बोट ठेवला. नांदुरकरांच्या या भुमिकेमुळे स्थायी समिती सभापती (Standing Committee Chairman) शीतल नवले यांनी प्रशासनातील तुमच्या इन्टरनल बाबी आम्हाला सांगू नका, आम्हाला रिझल्ट हवा असे सुनावले.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

स्थायीच्या सभेत हद्दवाढ गावातील नगरसेवक नरेश चौधरी यांनी वलवाडी भागातील पाणीपुरवठ्याचा मुद्दा मांडला. मनपा हद्दीत येण्या आधी आमच्या भागात दररोज पाणीपुरवठा होत होता. आता पाणीपुरवठा का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठ्याचे कर्मचारी मुजोर झाले आहेत ते ऐकत नाही अशा तक्रारी आहेत.

त्यावर कारवाई का करत नाही असा सवाल सभापती नवले यांनी केला.

त्यावर उपायुक्त नांदुरकरांनी दिलेल्या उत्तरामुळे सभागृहात खळबळ उडाली. मी मुजोर कर्मचार्‍यांना नोटीसा बजावल्या आहेत. कारवाई करायला गेले की ते वरुन अ‍ॅडजेस्टमेंट करतात असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आयुक्तांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

सभापती नवले यांनी तुमच्या अधिकार क्षेत्रात जेवढे येत असेल ती कारवाई करा, कर्मचार्‍यांचे निलंबन करा, तुमच्या प्रशासनातील इंटरनरल बाबी आम्हाला सांगु नका. आम्हाला रिझल्ट हवा,जनतेला पाणी मिळायला हवे असे सुनावले.

नरेश चौधरी यांनी धुळ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे देवपुरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे रस्त्यांवर दीड-दीड फुटांचे खड्डे पडले आहेत. चावरा शाळेकडील रस्त्यांची पार चाळण झाली आहे. कालच विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा उलटली. यावर मी आधी देखील बोललो होतो. तरी कारवाई होत नाही असा मुद्दा उपस्थित केला.तसेच एलईडी लावू नका किमान छोटे दिवे तरी लावा. उजेडात दिवाळी साजरी करु द्या, एलईडीची आशा आम्ही सोडली आहे. असे त्यांनी प्रशासनाला सुनावले.

नागसेन बोरसे यांनी अग्निशमन विभागाचा मुद्दा मांडला. दिवाळीत आगीच्या घटनांची शक्यता असते. मात्र सध्या अग्निशामक दलाला कुणीच वालीच नाही अशी स्थिती आहे. कर्मचारीच जागेवर नसतात. काही कर्मचारी 15 दिवसातून एकदा डयुटीवर येतात. जळगावच्या एक कर्मचारी तर महिन्यातून एकदाच हजेरी लावतो.

अग्निशामन विभागात सीसीटीव्ही का लावले नाहीत, अशा कर्मचार्‍यांना अभय कुणाचे? पाचकंदील मधील शंकर मार्केटला दोनदा आग लागूनही फायर ऑडीट का करण्यात आले नाही असा सवाल बोरसे यांनी केला. सभापती नवले यांनी अग्निशामक संदर्भातील बैठक घेणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com