‘मी पुन्हा आलो’ म्हणत टिंगलटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचा टोला; म्हणाले...

‘मी पुन्हा आलो’ म्हणत टिंगलटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचा टोला; म्हणाले...

मुंबई । Mumbai

शिंदे - फडणवीस सरकारने (shinde - Fadnavis government) आज (सोमवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. या बहुमत चाचणीत (floor test) भाजप- शिवसेना शिंदे गटाला (shinde group) १६४ मते मिळाली तर महाविकास आघाडीला (mahavikas aaghadi) ९९ मते मिळाली. यावेळी, सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. यानंतर, आभारपर भाषण करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या 'मी पुन्हा येईन' या वाक्यावरुन टिंगलटवाळी करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे...

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, मविआचे सरकार आले, तेव्हा मी म्हणत होतो, हे सरकार अनैसर्गिक आहे. तेव्हा मी एक कवीता म्हटली होती. त्यातून 'मी पुन्हा येईन असे म्हटले होते, त्यावर माझी खूप टिंगलटवाळी केली. पण मी आता पुन्हा आलो आहे आणि एकटा नाही आलो तर सगळ्यांना घेऊन आलो आहे. मी सगळ्यांचा आता बदला घेणार आणि बदला आहे की मी त्यांना माफ केले आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसता. प्रत्येकाचा मौका येत येत असतो. 'दुनिया में सारे शोक पाले नही जाते, काच के खिलोने हवा में उछाले नही, जाते सारे काम तक्कदीर भरसे टाले नही जाते' अशी शायरी म्हणत फडणवीसांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही विरोधी बाकावर होतो पण कधी विचलित झालो नाही. करोनाच्या काळातही जनतेमध्ये राहिलो. काही लोक हे आम्हाला म्हणतात की सत्तेसाठी आम्ही आहोत. पण, सामाजिक काम करण्यासाठी सत्ता हवी आहे. पर्यायी सरकार देणार असे म्हटलो होतो. आता नरेंद्र मोदी यांनी ते दाखवून दिले आहे. ज्या पक्षाने मला सर्वोच्च अधिकार दिले, आज त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याचे आदेश दिले मी ते स्विकारले. आज मी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com