देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, धनुष्यबाण...

देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, धनुष्यबाण...

धुळे । Dhule

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या (shivsena) अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात (Shinde Group) सामील होत आहे. त्यातच आता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचा वाद कोर्टात पोहचला असून ते नेमके कोणाकडे राहणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना कार्यकर्त्यांना संबोधित करतांना एक सूचक विधान केले आहे...

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, आता धनुष्यबाण कुणाचा हे निवडणूक आयोग (Election Commission) ठरवेल. आमचे समर्थन एकनाथ शिंदेंसह धनुष्यालाला आहे त्यांच्याकडे असलेले संख्याबळ बघता हा धनुष्य त्यांच्या बाजूने जाईल, तेव्हा हा धनुष्य मी त्यांना देईल, असे विधान फडणवीस यांनी केले आहे.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांना चांदीची गदा भेट देण्यात आली. विरोधकांना गाडण्यासाठी भेट दिल्याचा उल्लेख या भेटीतून करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणलेला चांदीचा धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला. शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच असल्याचा संदेश देण्यात आला आहे. या भेट वस्तूवरूनच फडणवीस यांनी हे विधान केले आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे धुळ्यात येणार होते मात्र आम्ही निर्णय घेतला की एक कार्यक्रम त्यांनी करावा एक मी करेल आणि म्हणून मी इकडे आलो ते तिकडे गेलो. तसेच गदा आपण आगोदरच चालवली आहे म्हणून परिवर्तन झाले आहे. कारण आता हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणायला बंधन नाही. आम्ही गदा धारी ते गधाधारी आहे, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com