Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याDevendra Fadnavis : कालची सभा निराश लोकांचं अरण्यरूदन; वज्रमूठ सभेवरून फडणवीसांची टिका

Devendra Fadnavis : कालची सभा निराश लोकांचं अरण्यरूदन; वज्रमूठ सभेवरून फडणवीसांची टिका

मुंबई | Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या गडचिरोलीच्या (Gadchiroli Visit) दौऱ्यावर आहेत. यावेळी ते काल मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेवर (Vajramuth Sabha) बोलले आहे…

- Advertisement -

दरम्यान, ‘मुंबईत झालेली कालची सभा ही निराश लोकांचं अरण्यरूदन आहे. सत्ता गेल्यामुळे ते निराशही आहेत, बावचळेलेही आहेत आणि तोल गेलेलेदेखील आहेत. त्यामुळे अशा लोकांनी एखादी गोष्ट बोलल्यानंतर ती किती गंभीरतेने घ्यावी, याचा विचार आपण केला पाहिजे’, असा असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधींचे निधन

पुढे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली असून, मविआच्या नेत्यांना केवळ आमच्यावर टीका करायची आहे. अडीच वर्ष सत्तेत असताना त्यांनी एकही विकासाचं काम केलं नाही. आताही ते केवळ आमच्यावर टीका करत आहेत. मात्र, आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही काल ३५० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं (Balasaheb Thackeray Clinic) उद्घाटन केलं. त्यामुळे हे केवळ बोलणारे लोक आहेत. जनतेच्या प्रती यांना काही देणं-घेणं नाही, असे ते म्हणाले.

Weather Alert : पुन्हा गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ ठिकाणी ऑरेंज अलर्ट

बारसूवरुन राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न

राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा एक गट आहे. हा गटही बारसूमध्ये (Barsu Refinery) सक्रिय असल्याचं समोर येत असून, बारसूमध्ये काही लोकांना नेण्यात येत आहे, कोण आहेत ते? या प्रश्नावरही फडणवीस यांनी माहिती दिली. त्या लोकांची माहिती मिळाली आहे.

काही नेतेही असल्याची मोठी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान उध्दव ठाकरे, राजू शेट्टी हे बारसूला जाणार असून यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? असे फडणवीसांना विचारल असता, ते म्हणाले की, आंदोलनाला मुळातच स्थानिकांचं समर्थन नाही. बाहेरून लोक नेवून आंदोलन करण्याचं काम चाललेलं आहे. स्थानिक अतिशय थोडे आहेत.

तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, एखादा अनुचित प्रकार झाला पाहिजे, सरकारला बदनाम करता येईल, अशी कुठलीतरी घटना घडली पाहिजे, असा काही लोकांचा प्रयत्न आहे. सामान्य नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय गोळी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यांनी काही केलं तरी जनतेला कळलेलं आहे, हे दुटप्पी आहेत ते. एकीकडे हेच पत्र पाठवतात, बारसूमध्ये रिफायनरी करण्यासाठी आणि तेच आंदोलनाला जातात, यामुळे यांचा दुहेरी चेहरा हा समोर आलेला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या