Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'मविआ' सरकारकडून अडीच वर्षात सूड उगवण्याचेच काम - फडणवीस

‘मविआ’ सरकारकडून अडीच वर्षात सूड उगवण्याचेच काम – फडणवीस

मुंबई । Mumbai

महाविकास आघाडी सरकारने (MahaVikas Aaghadi Government) अडीच वर्षात फक्त सुड उगवण्याचे काम केले असून या काळात अघोषित आणीबाणी होती. परंतु आता संत्तांतर झाल्यामुळे महाराष्ट्रातील जनता मोकळा श्वास घेत असून सत्तापरिवर्तन करणे ही बारा कोटी जनतेची इच्छा होती असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी केले आहे. राज्यात संत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पनवेलमध्ये (Panvel) भाजप (BJP) कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करतांना फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लबोल केला…

- Advertisement -

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार भगवान भरोसे चालत होते. तसेच त्यांच्या काळात प्रगतीचे कार्यक्रम ठप्प होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आपण मनाशी गाठ बांधली होती की एक दिवसही या सरकारला झोपू द्यायचे नाही.अनेक कार्यकर्त्यांवर केसेस केल्या. पण कोणी घाबरले नाही.

महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्ष फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात तर घर तोडू, खूप ठिकाणी पोलिस स्थानकात (Police Station) फिरवू असा त्यांचा कार्यक्रम होता.अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली होती. परंतु आम्ही सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे आता राज्यातील जनता मोकळा श्वास घेत असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तेचा गड आपण जिंकलो आहोत. मात्र मोदीजींनी जो विकास करायला सुरूवात केली आहे. तो विकासाचा रथ गेल्या अडीच वर्षांपासून थांबला होता. तो आता पुन्हा सुरू झाला आहे. तसेच राज्यात बदल झाला पाहीजे अशी जनतेच्या मनातील संकल्पना होती ती आज आपण खऱ्या अर्थाने पूर्ण केली आहे असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी मनापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अभिनंदन करतो. एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. एवढे सगळे लोक नसते आले तर त्यांचे सामाजिक, राजकीय जीवन, इतकी वर्षाची त्यांची पुण्याई संपविण्यात आली असती. पण त्यांनी ठरवले की मी बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) शिवसैनिक (Shivsainik) आहे, त्यांच्या विचारांशीच फारकत घेतली गेली, ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो, त्यांच्यासोबतच जावे लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जावे लागत असेल. इतकेच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात बोलणाऱ्यासोबत, दाऊदसोबत संबंध असणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचा शिवसैनिक तडजोड करु शकत नव्हता असेही फडणवीसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या