
मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना (Corona in Maharashtra) बाधितांच्या संख्येत वाढ (Increase in corona cases) होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्ती (Mask forced) लागू करणार का? यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर महत्वाचे विधान केले आहे...
याबाबत बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, सर्वांच्याच लक्षात आले असेल की करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबतही काल (दि०१) चर्चा झाली.
करोना बाधितांची संख्या वाढणे हे काळजी करण्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे करोना बाधितांची संख्या जर वाढत गेली तर नंतर कशा प्रकारे हाताबाहेर जाते हे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वांनी पाहिले आहे.
अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्याने (advice of a doctor) तिसरा डोस (बुस्टर डोस) घेणे गरजेचे आहे.
तसेच राज्यातील परिस्थितीवर आमची नजर असून आम्हाला जेव्हा वाटले की, मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे; तेव्हा आम्ही लगेच मास्क (Mask) बंधनकारक करु, असेही अजित पवारांनी सांगितले.