Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापीक कर्ज टाळणाऱ्या बँकांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश; वाचा सविस्तर

पीक कर्ज टाळणाऱ्या बँकांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश; वाचा सविस्तर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असताना आतापर्यंत बँकांनी अपेक्षेपेक्षा केवळ २५ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे. पीक कर्ज देताना बँका सीबीलाची मागणी करून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याच्या तक्रारी येत असल्याने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी चांगलेच संतापले. जर बँका सीबील चांगले नाही हे कारण देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. त्यावेळी बँकांच्या वतीने येत्या आठवडाभरात पीक कर्जाचे वाटप करण्याची हमी दिली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ २५ टक्केच पूर्ण झाल्याची माहिती मिळाल्याने देवेंद्र फडणवीस संतप्त झाले. काही बँक अधिकारी कर्ज वाटप करताना अडवणूक करण्याची भूमिका घेत आहेत.

नाशिकहून ‘या’ पाच शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु

शेतकऱ्यांना सीबिल आणि अन्य करणे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. पेरणी जवळ आली असताना त्यांना वेळेवर पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. पण बँक अधिकारी आपली हुशारी दाखवतात आणि अटी ठेवतात. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाला वंचित राहतो. जर बँक अधिकारी ऐकणार नसतील तर त्यांच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करा, असे आदेश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महिन्यातून एकदा पाणीपुरवठा

शेतकऱ्यांना खरीपासाठी देण्यात येणारे पीककर्ज ३१ मे पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही अपेक्षित कर्जपुरवठा झालेला नाही. केवळ २५ टक्के कर्जवाटप झाले आहे. शेतकऱ्याला ज्या कारणासाठी कर्ज हवे आहे त्यासाठी ते वेळेत उपयोगात आणले पाहिजे. यासाठी सहकार विभागाने नियोजन करणे आवश्यक आहे.

पीक कर्ज देताना बँका जाणीवपूर्वक वेळ लावत आहेत. पीक कर्ज हे कमी मुदतीचे असल्याने त्याला सीबील निकष लावू नये. सीबीलची अट ही दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी आवश्यक आहे. त्यामुळे बँका हलगर्जीपणा करून वेळ काढत असतील तर त्यांना हिसका दाखवावाच लागेल. आता एकाही शेतकऱ्याची तक्रार आली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असे खडे बोल फडणवीस यांनी सुनावले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या