
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरच ते चालत आहेत. त्यांचाच विचार पुढे नेण्याचे ते काम करत आहेत. त्यामुळे या निकालाबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करतो.
आता कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही. ज्यांच्याकडे शिवसेनेचा विचार आहे त्यांचीच शिवसेना खरी हे आम्ही सांगत होतो.निवडणूक आयोगाने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक आयोगाने याआधीच्या प्रकरणांमध्येही असाच निर्णय दिला आहे. आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घेऊन तसेच त्यांना मिळालेल्या मतांच्या आधारावर, टक्केवारीवरच असे निर्णय होत असतात असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.