Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करा, अन्यथा...; उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना फटकारलं

शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करा, अन्यथा…; उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना फटकारलं

मुंबई | Mumbai

यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच महावितरणच्या (Mahavitaran) ठिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे…

- Advertisement -

लातूरच्या औसा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप (BJP) आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी अभिमन्यू पवार यांनी महावितरणच्या कारभाराचा शेतकऱ्यांना कसा फटका बसतोय याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन करुन माहिती दिली.

India Alliance Logo : ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकललं, कारण काय?

या मुद्द्यावरून फडणवीस यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करा, अन्यथा सस्पेंड करेन. शेतकरी आधीच अडचणीत आहे. शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणू नका. त्यांना तात्काळ विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवून द्या, अशा सूचना यावेळी देवेंद्र फडवणीस यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

One Nation One Election : ‘एक देश एक निवडणूकी’च्या दृष्टीने एक पाऊल पुढे, माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

- Advertisment -

ताज्या बातम्या