विधानपरिषद निवडणूक : मविआ सोमवारी चमत्कार घडवणार - अजित पवार

विधानपरिषद निवडणूक : मविआ सोमवारी  चमत्कार घडवणार - अजित पवार
अजित पवार

मुंबई । Mumbai

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे (Rajya Sabha elections) विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (Legislative Council elections) चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची (Maharashtra) जनता पाहिल असे विधान उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे...

राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असून २० जून रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) तयारीबाबत माहिती दिली.

यावेळी अजित पवार म्हणाले की, विधानपरिषद निवडणूक लागली असून साधारण चार पक्षाचे एकूण ११ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. महाविकासआघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस (Congress) राष्ट्रवादी(Ncp) आणि शिवसेना(ShivSena) या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. तसेच मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, महाविकासआघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे जण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच पवार पुढे म्हणाले की, बहुजन विकास आघाडीला (Bahujan Vikas Aghadi) सर्वजण जावून भेटले असून त्यांची मते आपल्याला मिळावी यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. तसेच आजच्या घडीला २८४ आमदार मतदान करतील अशी शक्यता लक्षात घेता विजयी आमदारांना २६ मतांची गरज आहेत. तर ११ पैकी १० उमेदवार निवडून येणार असून एकट्याचा पराभव होणार. त्यामुळे चमत्कार तर होणार आहेच, पण तो कोणत्या बाजूने होणार ते सोमवारी महाराष्ट्र बघेल.असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून मत बाद होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. राज्यसभेत १ मत बाद झाले होते. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मते कुणाला द्यायची ते ठरवले जाईल. महाविकास आघाडीची एकजूट असून कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तसेच अपक्षांना काही नेत्यांनी फोन केला हे खरे आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ते झाले. काही अपक्षांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलतील त्यांना मतदान (Voting) करू असे सांगितल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com