Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआषाढी वारीसंदर्भात अजित पवारांची घोषणा

आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांची घोषणा

पुणे

आषाढी वारी होणार की नाही? या विषयावर अखेरी आज निर्णय झाला. सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यामुळे आषाठी पायी वारी होणार नाही. परंतु वारीसाठी १० पालख्यांना परवानगी दिली असून या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

- Advertisement -

SSC Exam Results : राज्याचा दहावीचा निकाल ३ जुलैनंतर लागणार

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील. प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचं पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या