Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या...यांच्या सभा दिवस मावळल्यानंतर सुरु होतात - अजित पवारांची टीका

…यांच्या सभा दिवस मावळल्यानंतर सुरु होतात – अजित पवारांची टीका

येवला | वार्ताहर Yeola

राज्यात विष कालवण्याचे काम सुरु आहे. जीभ उचलतात लावतात टाळूला. लोकांचे संसार उभे करायला खूप कष्ट करावे लागतात. यांना साध्या गावातल्या सोसायट्या माहिती नाहीत हो. यांच्या सभा या दिवस मावळल्यानंतर सुरु होतात अशी खरमरीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली….

- Advertisement -

ते येवला शिवसृष्टी भूमिपूजन समारंभात येवल्यातील अतिशय महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र असून त्यांच्या विचारांवर राज्य काम करत आहे. राज्यात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी येवल्यात उभी राहत आहे. आजचा हा दिवस येवलेकरांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. शिवसृष्टी प्रकल्पास कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

लोककल्याणकारी राज्य कसे असावे याच उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५० वर्षांपूर्वी दाखवून दिला. भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतून, पुढाकारातून येवल्यात शिवसृष्टी विकासाची गंगा भुजबळ साहेबांनी निर्माण केली.

अजाण सुरू असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले भाषण थांबविले. ही आपली संस्कृती आहे. एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण करून कोणाचेही भल होणार नाही. करोनाबाधित लोकांना अडचणीतून बाहेर काढले. माणूस जगविणे याला प्रमुख प्राधान्य देऊन काम केलं. त्यामुळे इतर विकास कामांना थोडा कमी निधी उपलब्ध करून दिला.

आत्ताच काही लोकांना भोंगे का आठवत आहे. कशा करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पवार साहेबांनी सर्व समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे. त्यांना जातीयवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशावर कुठलही बोलणार्याचे वय जेवढा आहे तेवढं पवार साहेबांच्या राजकारणाचा कालावधी आहे.

लोकांच्या मनामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांनी कधी साखर कारखाना, शिक्षण संस्था नाही, कुठली विकासाची काम नाही इतकेच नव्हे साधी सोसायटी देखील या पठयाने काढली नाही असा चिमटा काढला. धुडगूस घालायला डोकं लागत नाही.

योगी सरकारने केवळ मशीद नाही तर मंदिरावरील भोंगे देखील काढले आहे. ही सत्यता नागरिकांनी जाणून घ्यावी. महागाई वाढत आहे त्याबद्दल तर काहीच बोलत नाही. उन्हात सभा घेण्याचे कष्ट राज ठाकरे यांनी कधीच घेतले नाही. असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला.

राजकीय दुकानदारी चालविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव वापरतात. समाजात ही सगळी नौटंकी, नकलाकार आहे की भाषणकार आहे हेच कळत नाही श्रद्धेच लोकांना बनविण्याच, फसविण्याचं काम कोणी करू नये.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. त्यामुळे आपल्याला जातीय सलोखा ठेवावाच लागेल. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या