Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशबँक बुडाल्यावर आता पाच लाखापर्यंत रक्कम सुरक्षित, ही आहे योजना

बँक बुडाल्यावर आता पाच लाखापर्यंत रक्कम सुरक्षित, ही आहे योजना

केंद्रीय वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभागाअंतर्गत देशभरातील सार्वजनिक सहकारी आणि खासगी बँकांमधील (bank)ठेवीदारांसाठी किमान पाच लाख रुपयांपर्यंत खात्रीशीर विमा सुरक्षा कवच (insurance) मिळणार आहे. सरकारने सुधारणेचे मोठे पाऊल उचलत बँक ठेव विमा संरक्षण 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवले आहे.

या फोटोंनी सोनाली कुलकर्णीचे खुललं सौंदर्य

- Advertisement -

या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांच्या मुख्य उपस्थितीत दिल्ली येथील विज्ञान भवनात आज, रविवारी झाला. या योजनेमुळे दिवाळखोरी किंवा डबघाईस गेलेल्या बँकांमधील ठेवीदारांना विमासुरक्षा कवच मिळाल्याने, लाखो ठेवीदारांना विमा सुरक्षेचा लाभ होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो बँकांतील ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, डिपॉजिट इंश्योरेंस क्रेडिट गारंटी कॉर्पोरेशन (DICGC) योजना १९६० च्या दशकात आली. त्यावेळी ५० हजारापर्यंतची रक्कम मिळत होती. मग त्यात वाढ करुन एक लाख केली. तसेच रक्कम मिळण्यासही कालमर्यादा नव्हती. आता ही रक्कम पाच लाखापर्यंत वाढवली असून ९० दिवसांत ती देण्याचे बंधनही केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या